Saturday, 23 June 2007

Ajun kai have aasate

अजुन काय हवे असते
एकच चहा, तो पण कटींग...
एकच पीक्चर, तो पण टेक्स फ्री...
एकच साद, ती पण मनापासुन...
अजुन काय हवे असते आपल्या मित्रांकडून

एकच कटाक्श, तो पण हळूच...
एकच होकार, तो पण लाजून...
एकच स्पर्श, तो पण थरथरून...
अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून

एकच भूताची गोष्ट, ती पण रंगवून...
एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून...
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून...
अजुन काय हवे असते आपल्या आजीकडून

एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून...
एकच गरम पोळी, ती पण तूप लावून...
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून..
अजुन काय हवे असते आपल्या आईकडून.

एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन...
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोघर्या आवाजातून...
एकच नजर अभिमानाची, आपली प्रगती पाहून...
अजुन काय हवे असते आपल्या वडिलांकडून

सगळ्यांनी खूप दिले, ते पण न मागून...
स्वर्गच जणु मला मिळाला, तो पण न मरुन...
फाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन..
अजुन काय हवे मला माझ्या आयुष्याकडून

Thanks to my friend to send me such a wonderful poem

No comments: